STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Others

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Others

तरीही आम्ही बोलू नये?

तरीही आम्ही बोलू नये?

1 min
27.7K


काय चाललंय तेच कळत नाही 

सारं काही बिघडत चाललंय तरी 

कोणी कसं बोलत नाही ? 

सगळेच कसे झालेत संभ्रमित 

एवढं सगळं झाले तरीहीआम्ही बोलू नये?

कोण धावतोय कुणाच्या पाठी 

कुणाचं पाप, कुणाच्या माथी 

काही कळेना का पळतात

कुठवर आणि कुणासाठी  

 एवढं सगळं झाले तरीहीआम्ही बोलू नये?

आई - वडील वृद्धाश्रमात 

इवलंस बाळ पाळणाघरात 

आपुन बरे राजा- राणी 

अरे! थू तुमची जिंदगानी 

 एवढं सगळं झाले तरीहीआम्ही बोलू नये?

माणसं झोपतात उपाशी , अर्धपोटी 

कुत्र्यांना मात्र बिस्किटांची न्याहारी 

आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातय

मूर्खांचा शेजार कसा अवती - भवती  

एवढं सगळं झाले तरीहीआम्ही बोलू नये?

जाती पातीत झगडे लावता 

त्यातही तुमचं स्वार्थ पाहता 

आरे! थू तुमच्या जिंदगानीवर 

नि चुलीत घाला तुमचं राजकारण 

एवढं सगळं झाले तरीहीआम्ही बोलू नये?

आरे म्हणतात ना लबाडाचं आयुष्य थोडंच असत 

घडेल मनासारखं वाटतं, होत असं कधी - कधी

नेहमीच कसे हो गाजर दाखवता नि फुकटचा गाजावाजा 

मूर्ख नाही जनता आता फोडेलंच तुमचा भ्रमाचा भोपळा 

एवढं सगळं घडतय तरीही आम्ही बोलू नये?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy