STORYMIRROR

Vishakha More

Tragedy

5.0  

Vishakha More

Tragedy

रोजची तगमग

रोजची तगमग

1 min
35.1K


रोज म्हणते आज मी नव्याने सुरुवात करेल,

माझ्यामधल्या मला नक्की, नवी वाट मिळेल...


रोज वाटतं आज काही वेगळी गोष्ट घडेल,

आज तरी मला राव ट्रॅफिक कमी मिळेल...


रोज जातो गाड्यांचा तो धूर आमच्या नाकी,

नि हॉर्न वाजवत उर्मटपणे, पुढे जाते चारचाकी...


रोज चालतो बसमधे जागेसाठी तंटा,

कधी कधी उभ्या उभ्याच निघून जातो घंटा...


मग रोज आपला तोच PC, रोज तीच Chair,

Keyboard वरची बटणं दाबून कामं करायची Clear...


रोज बघायचे तेच तेच मरगळलेले चेहरे,

याचं त्याचं gossip ऐकून कान होती बहिरे...


रोज असतो परतीचा तो एकच रस्ता,

परतताना परत तशाच खाव्या लागतात खस्ता...


रोज नुसता डोक्यावर ओझं घेऊन जगायचं,

Robot सारखा काम करून एक दिवस मरायचं...


रोज पडतं कोडं मला, आपण का इतका धावतो?

गर्दीच्या या लोंढ्यात का उगाच वाहतो?


रोज वाटतं आजतरी सुटेल माझा कोडं,

धावता -धावता गर्दीतून या थांबूया का थोडं?


रोजच असं सुरु राहता विचारांचं सत्र,

वर्षामागून वर्ष गेलीत, उमटेल ना माझा खरं चित्र...?


म्हणून रोज सांगते स्वतःला,आज मी नव्याने सुरुवात करेल,

माझ्यामधल्या मला नक्की, नवी वाट मिळेल...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy