Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mohit Joshi

Tragedy

3  

Mohit Joshi

Tragedy

साथ मागतोय

साथ मागतोय

1 min
13.7K

आयुष्याच्या उत्तरार्धात काठी नाही हात मागतोय

दरमाही भीक नको थोड्या दिवसानची साथ मागतोय ।

असेल भ्रष्ट झालेली बुद्धी आणि वाकलेला कणा

आयुष्यभर केलेल्या कष्टांच्या गंजलेल्या ह्या खुणा ।

मान्य ! ति ऐट, तो रुबाब आता उरलाच नाही

जिभेवर ना शब्दांची घाई, ना लेखणीत उरलीय शाई ।

सैल होतेय पकड आणि जीर्ण झाले डोळे

कधी निसटले कळलेच नाही मला माझ्या हाताखालचे घोडे ।

आता ना कुठला व्याप ना कुठले कुणाचे कर्ज

मृत्यु चे अंतर मोजण्यात दिवस होतोय खर्च ।

मी आयुष्यात नेहमीच प्रवासावर करत आलोय प्रेम

कारण कुठे जाऊन पोहचेल याचा कुणालाच नाहीय नेम ।

Rate this content
Log in

More marathi poem from Mohit Joshi

Similar marathi poem from Tragedy