भारताची तरुण नजर
भारताची तरुण नजर
कॉलेज लाईनला आलो आहे, चुकली का माझी दिशा??
जाणवते की इथे आहे सर्वाना मुलींची नशा ||१||
वर्गात आलो, भेटले मित्र, बोललो त्यांच्याशी २-२ शब्द |
विचार ऐकता काही जणांचे झालो मी स्तब्ध ||२||
क्षणभर थांबलो म्हटलं त्यांना “का रे तुमच्या नजरा आशा??”
विचार केला मुलींचा म्हटलं, “या शांत बसतात तरी कशा” ||३||
गेला काही काळ असे चढू लागले रंग |
बघता बघता या मुली आता त्याच मुलांच्या संग ||४||
पुन्हा क्षणभर विचार केला “का लढावं यांच्यासाठी??”
जर मुलीच वाट पाहत असतात अशीच मुलं टिपण्यासाठी ||५||
यामध्ये मला सांगा चूक काय मुलांची??
अहो मुलं अशीच वागणार, कारण साथ त्यांना मुलींची ||६||
मुली बघता मुलं म्हटली काय ITEM काय ही FIGURE |
चेहरा आणि मन सोडून सर्वांची फक्त BODY वर नजर||७||
गरज आहे सर्वाना विचार पद्धती बदलण्याची |
आपण भारत देशात राहतो, ही जाणीव करून देण्याची ||८||
अहो, तासभराचं शारीरिक सुख, ही शरीराची भूक आहे |
रोज २ तास देशसेवेत आयुष्याचं मानसिक सुख आहे ||९||
संकुचित विचारसरणीमुळे शारीरिक झालंय प्रेम |
मुलगा झालाय खेळाडू आणि मुलगी झालीय GAME ||१०||
या वाईट विचारांना जरा आपल्या मनातून उतारा |
ह्याने, देशात तरुण असले तरी देश वाटतोय म्हातारा ||११||
प्रेम करा मनावरती, प्रेमात काहीच गैर
नाही |
शारीरिक सुखावाचून इथे कोणी इतकं अधीर नाही ||१२||
चारित्र्यशील वागून आता वाढवू आपल्या देशाची शान |
मग पुन्हा ताठ मानेनं म्हणू
||माझा भारत देश महान, माझा भारत देश महान||
