मानवी निसर्ग
मानवी निसर्ग
पावसाच्या थेंबाला माहित नव्हतं, तो कुठे वाहतोय ।
सहज विचारलं तर म्हणाला, मीही तेच पाहतोय ॥
वाहत्या वारयाला म्हटलं, बाबा तू कुठे चाललास?
म्हणाला, तूझ्या जवळ येता बाळा तू का हललास?
प्रखर त्या सुर्याला म्हटलं, लेका तू एवढा जाळ का काढला?
प्रतिप्रश्न करत म्हणाला, सांगा तुमही ozone layer का फाडला??
पानं, फुलं, झाडांना विचारलं तुम्ही का रडता?
म्हणाले नीच मनुष्य प्राण्या तुम्ही आम्हाला का तोडता?
मुक्या त्या प्राण्यांना म्हटलं, बाबांनो तुम्हाला काही ञास?
म्हणे बास कर आता माणसा, तू जंगलाचा केलास ऱ्हास.
दगड, माती, धोंड्याना म्हटलं तुम्ही तरी खुश ना??
म्हणाले "तू खुश तर आम्ही खुश" कारण आमच्या सारखा तुच ना ॥
अशी सर्व गाऱ्हाणी ऐकुन, शर्मेनं मान खाली झाली,
अन आजवर केलेल्या कर्माची जणु पोचपावतीच मिळाली ॥
सहज नजर वर गेली तर हसत होतं आकाश ।
म्हटलं तुझ्या हक्काच्या निसर्गाचा,
माणसा तुच करतोयस विनाश ॥
