ब्युटी क्वीन
ब्युटी क्वीन
तुला पाहता मी असा दंग झालो |
आधी बावरा मग मी बेधुंद झालो ||
तुझ्या गोड हास्याची किमया ती न्यारी |
क्षणात भुलवून टाकी मला तुझी अदाकारी ||
काय ती डोळ्यांची अदा आणि जीव्हणी ती लाल |
करता डोळ्याने वार केलेस ओठानी बेहाल ||
मधहोश ती नजर करी बेहोष तुझी चाल |
नाजूक ती स्माईल करी हृदयाचे हाल ||
मुलायम ते केस आणि मखमली ते गाल |
जसा वेल्वेटच्या सोफ्यावर कापसाचा रुमाल ||
सुंदरशा चेहर्याला शोभेल अशी मान |
अगं, सर्वांगी ठेवण तुझी “BEAUTY QUEEN” समान ||

