STORYMIRROR

Manish Vasekar

Others Tragedy

3  

Manish Vasekar

Others Tragedy

पाऊस, तोच

पाऊस, तोच

1 min
27.8K


आसमान काळवंडून आलं

कडकडाट रौद्र ढगांचा

काळजात कसं चर्रर्र झालं

आठवून थैमान मागच्या पावसाचा


वाऱ्याचा घोंघावणारा आवाज

छपरावरची पॉलिथीन केव्हाच गेली उडून

पत्रांचा जीवघेणा थरथराटी आवाज

भुंकून-भुंकून मोत्या गेला थकून


पाऊस अन संतत धारा

मातीचा सुगंध क्षणभंगुर

थंडगार झोंबणारा रोगट वारा

पावसापश्चात उरणार फक्त काहूर


शहराची अतिव गलिच्छ वस्ती

नाले-गटर, खोपटं सारंच जलमय

पुरात वाहून मरण्याची कायम धास्ती

डेंगू मलेरियाला नेहमीचाच अभय


कसला आलाय ऋतू हिरवा

तुडुंब खोपटात आम्हा राहवेना

शेतीलाच तो पाऊस बरवा

शहरात, गरिबाला दुःखीच भावना


Rate this content
Log in