नाते...
नाते...
वादळास काय तोलले मी
उजाडली ती माळराने पाहू कितिदा मी
सुखाची वाट येत ना परतुनी
या यातना उगा उरी जपू कितीदा मी
सोहळेच भग्नतेच्या नावाखाली
उरली आयुष्याची राख मोजू कितीदा मी
फिरूनी रानात काय पेरू मी
रखरखत्या उन्हात सावली करु कशी मी
उगीच का आस दावू मनासही
घेतले समजावूनी मनी कितीदा मी
नाते फुकाचे असे जपू कितीदा मी
जीवनी ताप हा सांग साहू कितीदा मी