शोषण (सहाक्षरी)
शोषण (सहाक्षरी)
भांडवलशाही
वाढते प्रवृत्ती
कामगारांचेच
शोषण करती
तीन तीन शिफ्ट
चाले कारखाना
संरक्षण वस्तू
कुठे सापडेना
कमी पगारात
उत्पन्न दुप्पट
मालक करतो
सदाच कपट
सेवा सुविधांचा
नसे पुरवठा
घडे अपघात
अश्रूंचाच साठा
ज्याच्या हाती आहे
पृथ्वी तरलेली
झोळी ती त्याचीच
रिती राहिलेली
