माझं मी म्हणू कुणा..
माझं मी म्हणू कुणा..
किती स्वप्ने घेऊन उरी
जगतो हे जिणे,
टाकुनिया सारेच
आहे शेवटी जाणे..
किती केला आटापिटा
जवळ दूर केले कुणा,
खोटेच सारे जन
खूप पाहिला स्वार्थीपणा.
कोण चांगला, वाईट
नाही कुणाचा भरोसा,
मतलबी दुनिया सारी
दावू कुणा हा आरसा..
सर्व नाती खोटी खोटी
खूप पाहिला लावून जीव,
निघाले जीव ते घ्यायला
कळला साऱ्याचाच डाव..
नियत ज्याची खोटी
कसे जगतील सुखात,
आहे साऱ्यांनाच जाणे
कोण आलंय राहायला इथं..
खूप पाहिला प्रत्येकाचा
जिथे तिथे स्वार्थीपणा,
साऱ्यांनीच दिला धोका
माझा मी म्हणू कुणा..?
