STORYMIRROR

Kanchan Vispute Wagh

Tragedy

3  

Kanchan Vispute Wagh

Tragedy

शहीद जवान

शहीद जवान

1 min
253

देशभक्तीचा पण घेऊन

जात आहे मी लढाईला

मातृभूमीचे ऋण फेडण्या

शहीद होत आहे हा लढवय्या

       देश संरक्षणासाठी

       पेलत आहे हा भार गोळ्यांचा

       प्राणाची आहुती देत आहे

       शूरवीर मी देशाचा

मातृभूमीसाठी प्राण देताना

आठवत आहे सारी जीवन गाथा

आई वडिलांचे वासल्य

अन् पत्नीच्या प्रेमाची प्रेम कथा

      माफ कर प्राणप्रिये

    तुझे सर्वस्व तुला सोडून जात आहे  

      जाताजाता वचन मात्र                  

      तुझ्याकडून घेत आहे

हिंमत हारू नको शूरवीर 

जवानाची पत्नी तू

पेटव देशभक्तीची ज्योती

आपल्या लेकरात तू

      होऊ दे त्यांना सैन्यात भरती 

      घडू दे त्यांच्या हातून देशभक्ती

  मातृभूमीचे पांग फेडतील लेकरे माझी

      तेव्हाच मिळेल मला खरी मुक्ती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy