नारीशक्ती
नारीशक्ती
चूल आणि मूल
संभाळत संभाळत
नारीने उंबरठा ओलांडला
नारीशक्तीचा बाणा जगाला दाखवला..१
पुरुषी अहंकाराला घातला आळा
संकटांवर केली मात
नवनवीन आव्हाने पेलत
वाढवला स्त्रीचा सन्मान....२
आधुनिकतेची चढवली झालर
विज्ञानाची घेतली साथ
आणि जगाला दाखवून दिली
नारीशक्तीची कमाल....३
नारीशक्ती आहे एक वाट
अशक्य ते शक्य करून
दाखवणारी प्रभावी अशी
अशी ती स्त्री जमात...४
