STORYMIRROR

Kanchan Vispute Wagh

Inspirational

4  

Kanchan Vispute Wagh

Inspirational

विषय : आनंद या जीवनाचा

विषय : आनंद या जीवनाचा

1 min
171

नको रे मानवा 

मृगजळाच्या मागे धावत राहू

स्पर्धेच्या या युगात

आनंदाने जगण्याचे तंत्र शिकत राहू


विसरून सारे भूतकाळातील मनस्ताप

भविष्यातील चिंतेला दूर लोटू

वर्तमानात जगत जगत

आनंद या जीवनाचा घेत राहू


करुनी निष्काम कर्म

साधू ईश्वरीय सानिध्य

बाळगु समाधानी वृत्ती मनी

सकारात्मकता जीवनात नांदवु


क्षमाशीलता जीवनात आणू 

दुसऱ्यांसाठी जगत राहू 

चिंता करण्यापेक्षा चिंतन करत 

आनंद या जीवनाचा घेत राहू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational