STORYMIRROR

Kanchan Vispute Wagh

Others

3  

Kanchan Vispute Wagh

Others

आयुष्यावर बोलू काही

आयुष्यावर बोलू काही

1 min
212

आयुष्याचे हितगूज मांडत राहू 

चला मित्रहो आयुष्यावर बोलत राहू....


बालपणीच्या सुखद आठवणींना 

तारुण्याच्या प्रेमाच्या सुलभ भावनांना 

उजाळा देत राहू चला

मित्रहो आयुष्यावर बोलत राहू.....


संसाराचा गाडा पेलत कधी पोचलो उतार वयाच्या 

उंबरठ्यावर याचा

आढावा घेत राहू चला 

मित्रहो आयुष्यावर बोलत राहू....


आयुष्य म्हणजे काय असतं प्रत्येक वळणावर 

सुखी-समाधानी राहण्याचं तंत्र असतं 

सुखी जीवनाचे तंत्र शिकत राहू चला 

मित्रहो आयुष्यावर बोलत राहू....


Rate this content
Log in