STORYMIRROR

Kanchan Vispute Wagh

Inspirational Others

4  

Kanchan Vispute Wagh

Inspirational Others

वसुंधरा

वसुंधरा

1 min
155

जन्मापासूनच होती मी समृद्ध

सुखाने नांदत होती चोहीकडे

हिरवा शालू परिधान करून

ऐटीत पाहत होती मी सृष्टीकडे


लेकरे होती माझी अज्ञानी

संभाळत होती मला जीवा परी

लेकरे झाली माझी ज्ञानी

आधुनिकतेची चढवली झालर माझ्यावरी


बलाढ्य कारखाने उभारले 

वायू आणि जल प्रदूषण वाढवले

मानव आणि जलचर जीवन

मानवानेच उध्वस्त केले


भूमी सपाट केली जंगले

उभारले डौलदार इमारती आणि बंगले

थांबवा लेकरांनो आता तरी जमिनीची धूप 

नाहीतर मानवजातीवर संकट येईल खूप


जागे व्हा लेकरांनो

मागणे हेच तुमच्या पृथ्वीचे

थांबवा आता ध्वनी, जल, वायू प्रदूषण सारे

अन् फुलवा जीवन नव्याने या वसुंधरा मातेचे          


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational