शीर्षक :अशी मी तशी मी
शीर्षक :अशी मी तशी मी
1 min
222
अशी मी तशी मी
उत्तम गृहिणी मी
संसाराचा मेळ राखण्याचा
प्रयत्न करते मी...१
अशी मी तशी मी
सुगरण मी
रोज रोज करते
नव-नवीन मेजवानी मी...२
अशी मी तशी मी
कवितेची वेडी मी
नवनवीन सादरीकरणाचा
प्रयत्न करते मी...३
अशी मी तशी मी
लेकरांची माय मी
लेकरांना उत्तम घडवण्याचा
प्रयत्न करते मी...४
अशी मी तशी मी
फारच हौशी मी
मनमुक्त जगते मी
जीवनाचा आनंद घेते मी...५
