STORYMIRROR

Kanchan Vispute Wagh

Romance

3  

Kanchan Vispute Wagh

Romance

प्राणसखा

प्राणसखा

1 min
185

बालपणी सोबत खेळत खेळत

कळलेच नाही सख्याचा

कधी झाला तू प्राणसखा

हृदयात माझ्या बसला बालसखा....१


लपूनछपून भेटताना

यायची खूप खूप मज्जा

संगत तुझी हवीहवीशी

वाटायची प्राणसख्या....२


थाटला असला तुझविना

संसार रे मी माझा

तुझ्या आठवणीशिवाय

जात नाही एकही दिवस माझा...३


अजूनही वाटते

पळत पळत यावे

तुझ्या कुशीत शिरावे

सातजन्म तुझ्या सोबतच राहावे...४


तुजविना वाटतो

एक-एक क्षण सजा

इतकेच सांगते प्राणप्रिया

तूच रे माझ्या हृदयाचा राजा.....५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance