STORYMIRROR

Sarika Gundawar

Tragedy Others

3  

Sarika Gundawar

Tragedy Others

हुंडा

हुंडा

1 min
206

बाबा माझ्या लग्नासाठी, हुंडा तुम्ही देवू नका, 

अभिमानाने जपलेल्या स्त्रीत्वाला असं चव्हाट्यावर ठेवू नका. 


जिवंत व्यक्ती मिळते दानात, त्याला कन्यादान असे नाव, 

समाजाची रित म्हणून, कसं काय लावला तुम्ही माझा भाव. 


जे लग्नाआधी ठरले आहेत पैशाचे गुलाम, 

"मुलगी माझी सुखी होईल" तुमच्या या स्वप्नाला सलाम. 


प्रत्येक स्री जिवाशी खेळून, घराला देते मुलाबाळांचं सुख, 

 हुंडा म्हणून काय मागता, यातून दिसते फक्त पैशाची भूक. 


स्त्रीत्व एक वरदान आहे, किनार पैशाची त्याला लावू नका, 

मुलगी आली वयात, तिला ओझं म्हणून पाहू नका. 


प्रेम आणि त्याग हुंडा म्हणून मागा, 

विचार बदला समाजही बदलेल, नका देवू हुंडाबळीला जागा. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy