माझा स्वभाव
माझा स्वभाव
लहानपणापासूनच स्वभाव माझा भित्रा
पळत सुटते मी मग मुंगी असो वा कुत्रा
शाळेत जायला लागले तसा स्वभाव झाला अभ्यासू
नविन विषय शिकण्यासाठी झाले मी जिज्ञासू
काॅलेजमध्ये गेल्यावर स्वभाव झाला हट्टी
नविन मैत्री करण्यात छान जमायची गट्टी
लग्न होताच स्वभाव माझा, झाला समजूतदार
थोडासा हळवा आणि थोडासा दिमाखदार
आई होताच स्वभावाने शिकले समर्पण
जीवन जगावे दुसऱ्यांसाठी, टाकून द्यावे "मी" पण
