STORYMIRROR

Sarika Gundawar

Children

3  

Sarika Gundawar

Children

स्पर्श

स्पर्श

1 min
208

स्पर्श तुझा गं लाडके, वाटतो मज ओळखीचा

तू कोण कुठुनी आली पोटी, हक्क दिला मज माऊलीचा


तुझ्या येण्याने कळले की जगणे माझे होते शून्य

बोल बोबडे ऐकून वाटे काही नको, मी झाले धन्य


तूच आशा तूच भरारी, तूच विजय या लढतीचा

पाऊल टाकून सोबतीने चुकवू वार नियतीचा


काळीज माझे मला विचारे कशी ही किमया नात्याची

आज उमगले माझे मजला, न्यारी ओढ रक्ताची


बिलगून तुजला मी स्वर्ग गाठते अंतरीचा

तूच आसरा जीवनात गं, मान मिळाला पुर्णत्वाचा


तू चुंबन घेता गालावरती मज नभ ही वाटे ठेंगणे

नको ईश्वरा अन्य मज मोठे, हेच तुला रे सांगणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children