जीवनाच्या प्रवासात
जीवनाच्या प्रवासात
जीवनाच्या प्रवासात माणूस निघाला भरभरभर
सुखी असल्याचा आव दाखवला वरवरवर
नात्यांपासून केली नुसती पळपळपळ
मत्सर ठेवून मनी केली खुप जळजळजळ
कोरोनाने जीव घेतले, तेव्हा झाली हळहळहळ
अरे माणसा, पैश्यापायी करू नको वळवळवळ
फक्त प्रेमासाठी होऊ दे, रक्ताची तुझ्या सळसळसळ
आला जरी यम, अन् म्हणू लागला चलचलचल
होणार नाही हृदयी तुझ्या कलकलकल
म्हणूनच वाहू दे, प्रेमाचा झरा जीवनी खळखळखळ
