वसुंधरा..
वसुंधरा..
उन्हांन झाली लाही लाही
वसुंधरा भेगाळली ..
वाट पाहतेय पावसाची
किती तान्हेजुण गेली...
" ग्लोबल वार्मिंग" च्या
सोंगाने तापमान वाढले .
नष्ट झाली वनराई
मेघ दिसेनासे झाले..
"काँक्रीटी" करणासाठी
मानवा तोडलेस वृक्ष ..
श्वासांचा कोंडमारा झाला
वसुधा झाली रुक्ष ...
हिरवळ लुप्त झाली
ओसाड झाली माळराने..
रडते मनोमनी वसुंधरा
कुरघोडी केली मानवाने...
"वृक्षवल्ली सोयरे वनचरे "
ध्यानी ठेव तू सदा ;
पर्यावरणाचा ऱ्हास झाला
माफ कशी करेल वसुधा ?
निसर्गाने दिलयं धन
वसुंधरेच्या रूपानं ;
वृक्षलागवड - संवर्धनाने
करू पर्यावरणाचे जतन.