कुठे कुठे शोधू मी तुला
कुठे कुठे शोधू मी तुला
आयुष्याच्या प्रवासात भेटलास तू
अचानक जिवनातूनी हरवलास तू
नियतीने घाव घातला सुखावरती
सांग ना आता कधी भेटशील तू
सांग कुठे कुठे शोधू तुला
माझ्या प्रेमफुला विरह जाळी मना
प्रीतीचा हा दाह सोसवेना आता
कोणास सांगू ही विवंचना
हृदयीच्या स्पंदनात निसर्गाच्या सान्निध्यात
आठवणींचा मोरपिसारा प्रत्येक श्वासात
किती गोंजारू तो पुन्हा पुन्हा
भेट ती खरी की होती आभासात
पुष्प ना देती सुगंध जीवनास ना रागरंग
तुजवीण वाटतो अर्थहीन दुनियेचा संग
भाव मनात साचे, स्पर्श हा तुझाच भासे
भेट होता तुझी उलगडेल हे अंतरंग
भोगुनी जीवन यात्रा संपला देह जरी
आस तुज मिलनाची मिटेल ना अंतरी
सांग तू भेटण्यास मजला येशील का?
आसवे दोन मजसाठी गाळशील थडग्यावरी
