Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Tragedy

4  

Neha Ranalkar

Tragedy

मुलीचा जन्म

मुलीचा जन्म

1 min
326


मुलीचा जन्म मध्यंतरी नव्हता

मुला इतकाच महत्वाचा |

मुलाचा जन्मच मात्र प्रतिष्ठेचा

वारसदार ठरे घराच्या सत्वाचा | |१| |


आता मात्र होतंय स्वागत तिचंही

पुर्वी सारखं गर्भापात न करता |

तरी काही अंशी आजही दुर्लक्षित 

बेवारसपणे कचऱ्यात सडता | | २| |


आज काही प्रमाणात तरी दिला

जातोय तिला मान सन्मान |

लग्नाच्या मुलांच्या तुलनेत कमीच

मुलींचे जागतिक स्तरावर प्रमाण ‌| |३| |


स्री असते जन्मदात्री पुरुषाची

तिच नवमास साहते त्याचा भार |

पुरुष पिता तशी ‌स्री माता असते

कन्यारूप जन्म घेई आकार | |४| |


मुलीचा जन्म प्रगतीची दिशा

दाखवतो सासर माहेराची |

नको चिंता आईबापाला मुलीच्या

हुंड्याची वा सासरच्या आहेराची | |५| |


सावित्रीबाई फुल्यामुळे मिळतोय 

घरातल्या लक्ष्मीचा तिला मान |

मुलीचा जन्म आता स्वागतार्हच

किमान वाटतात तरी साखरपान | |६ | |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy