सत्तेची खुर्ची ( सहाक्षरी )
सत्तेची खुर्ची ( सहाक्षरी )
याला ज्याला त्याला
सगळ्यांना कशी
हवी हवीशी हो
सत्तेची ती खुर्ची
खुर्चीची नशाच
उतरत नाही
बरबाद झाली
कित्येक घराणी
फोडाफोड सदा
आकड्यांची खेळी
पक्षाला सोडती
बहुमता साठी
साम दाम दंड
भेद सदा राही
निवडणूकाच
अंगी संचारती
हाती घेण्या सत्ता
हात मिळवणी
कार्यकर्ता मग
डोकेच खाजवी
