Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

sarika k Aiwale

Tragedy

4  

sarika k Aiwale

Tragedy

दूर राहिले गाव

दूर राहिले गाव

1 min
208


दूर राहिले गाव आता दूर राहिले नाव 

भेटण्या मागे वळता परके जाहले भाव 


येता आठवणी यातना नसता साठवणी

एक अनामिक ओढ अजूनी जागले घाव 


आज दूर राहिले गाव अस्तित्वाचा कुठे ठाव 

मनीच्या तळाशी असे वादळसम स्वभाव 


थिजलेली जीर्ण नजर ही पुसते पावलास 

कुठे तुझ्या मनातला तो तुझा असा एक गाव 


दूर राहिले गाव आता दूर राहिले नाव 

भेटण्या मागे वळता परके जाहले भाव 


क्षीणली नजरेतील आस आता एकली ती वाट 

भोगल्या रुजल्या व्यथांचा का भासे अभाव 


जाणीवांच्या खुणटल्या वाटे परक्या त्या संवेदना 

आपल्या छबीस ही विसरली कशी ती छाव 


परतुनी जाऊ कुठे वाटा दावती अनोळखी छवी 

आज हरवली वाटे जाणीवांचा उरी होता भराव 


दूर राहिले गाव आता दूर राहिले नाव 

भेटण्या मागे वळता परके जाहले भाव 


नसता उठाठेव मनिले जी अस्तित्वाची झुळुक

घरटं प्रेमाचं मागं राहिलं नाकरेत कोरडे भाव 


अस्तित्वासाठी दिला स्वाभिमानी पायदळी 

अमान्य करतात तेच आपले कसे मी जाणवे 


आज येता अाठवणी नसता मनी साठवणी 

सारा गाव जमलाय बोलायला परका भाव 


अभावात होते त्यांच्या काय वाईट जाणले 

कळता आपुलकीचे नाते परके जाहले गाव 


दूर राहिले गाव आता दूर राहिले नाव 

भेटण्या मागे वळता परके जाहले भाव


Rate this content
Log in