धूक्यातली वाट
धूक्यातली वाट
कुठे हरविली सख्या
धूक्यातली पायवाट
तिन्हीसांजा होताच
कशी शोधू पळवाट
रानवाटा धूरकटल्या
पसरला सारा अंधार
सख्या तुझ्या हाताचा
मज वाटतोय आधार
रेंगाळताच वाटेवरती
धूरकट याच सावल्या
ताडमाडाच्या वृक्षांनी
वाटाही झाकोळल्या
नको सोडू माझा हात
वाटतोय तुझा भरवसा
साथही जन्मोजन्मीची
विसरलास तू रे कसा
