प्रदूषण..
प्रदूषण..
जिकडे तिकडे प्रदूषण
श्वास नुसता गुदमरतोय..
वृक्षतोड करुनी आपण
पृथ्वीला वांझोटी बनवतोय..
सृष्टीचं मोहक सौंदर्य
म्हणजे हिरवाईचा साज..
अमानुषतेने ओरबाळतो मानवा
चढलाय तुला माज...
जलप्रदूषण, वायुप्रदूषण
अन वाढतेय ध्वनिप्रदूषण..
कुणालाच नाही काळजी
करण्या पृथ्वीचे रक्षण..
चला मिळून करूया
आपण वसुंधरेचे जतन..
हिरवा निसर्ग फुलेल
थांबेल हे प्रदूषण...
सृष्टीत नवचैतन्य आणू
"झाडे लावू झाडे जगवू"..
वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेता
वणसंपदा फुलवू-फळवू..
गर्द दाट वनराई
हिरव्या झाडीत नटेल..
भयमुक्त होईल वसुंधरा
जीवघेणे प्रदूषण घटेल..