STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

3  

Monali Kirane

Tragedy

मी एक पाडलेला पूल

मी एक पाडलेला पूल

1 min
134

उभा होतो दिमाखात कधी करत मदत कधी कोंडी,

विस्फोटांनी तीस सेकंदात उरलो नुसता दगड नी धोंडी.

चूक काय माझी,माणसांना नाही दूरदृष्टी

विस्तारणा-या शहरामुळे माझ्या नशिबी मात्र अंत्येष्टी.

अनियंत्रित फाफटपसारा,ना नियोजन ना शिस्त,

कामचलाऊ उपायांवर राज्यकर्त्यांची भिस्त.

पाडून असे पूल नी इमारती,लोकांचा पैसा जमीनदोस्त

भरडते सामान्य जनता,मधले फायदेकरी मदमस्त!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy