STORYMIRROR

Monali Kirane

Abstract

3  

Monali Kirane

Abstract

बाई की माणूस?

बाई की माणूस?

1 min
206

बाई म्हणून दुबळेपण कशाला हवं आता?

समानतेच्या आभासाचे दांभिक गाणे गाता


घराची पेलत जबाबदारी गृहीत धरत जाता,

कामच तिचं त्यात काय म्हणत अंत किती पहाता!


किंमत फक्त पैशांना -ना मायेला आदर देता,

विरोधाच्या नकाराचा का अट्टाहास होता?


उंबरठ्याच्या पलिकडचं क्षितीज घेतलं कवेत,

घरामधल्याच श्रृंखलांना मुक्त विचार हवेत


नकोत वेगळ्या सुविधा,नको स्त्री मुक्तीचे चोचले,

माणूस फक्त समजाल तेंव्हाच अंतर्भाव पोचले!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract