प्रवास
प्रवास
जन्म घेता रडण्यापासून सुरू झालेला प्रवास,
मधेमधे भौतिकाचा मनी धरत हव्यास
न चुकणारे चुकवण्याचा फोल अखंड प्रयास,
चार खांद्यांपेक्षा जास्त कमावण्याचा ध्यास
क्षणाक्षणांनी कूर्मगतीचा अटळ जीवन-हास,
कोण कष्टले कोणासाठी किती नवस-सायास
प्रवास खुंटे रडण्यासंगे संपून जाता श्वास,
पुन्हा नव्याने नव्या शरीरे सुरू आत्म्याचा प्रवास!