STORYMIRROR

Rajendra Udare

Tragedy Others

4  

Rajendra Udare

Tragedy Others

गार पडली

गार पडली

1 min
191

हिवाळ्यात अचानक गार पडली

किमया निसर्गाची अशी झाली


मुसळधार पावसाची धार लागली

सोबत भली मोठमोठी गार पडली


बहरलेली द्राक्षे डाळींब व केळी

आणि बागा जमीनदोस्त झाली


हातातोंडाशी नगदी पिके आलेली

शेतकऱ्यांची स्वप्न धुळीस मिळाली


गुर आणि ढोरंही पार झोडपली

दुष्काळात आणखी भर पडली


गार पाहायला आप्त मित्रमंडळी

काळजीने गावाकडं सर्व धावली


पाहणीस अधिकारी मंडळी आली

वर्तमानपत्रात फोटो बातमी छापली


अनुदान घोषणा हवेतच विरली

प्रत्यक्षात मदतही गारच पडली


शेतकऱ्यांनी खूप अश्रू ढाळली

शेवटी अश्रू ही गार गार पडली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy