STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Others

4  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Others

काळाच्या ओघात...

काळाच्या ओघात...

1 min
259

काळाच्या ओघात खूप काही घडून गेलं,

खूप काही बदलून गेलं.


खूपदा इच्छा नसताना ही स्वतःला मी बदलून टाकलं.

स्वतः चं अस्तित्वच जणू काही मी मिटून टाकलं.


ज्यांच्यासाठी मन मारलं त्यांनी कधीचं मला समजून नाही घेतलं.

याला काय वाटेल, त्याला काय वाटेल,यांतच मी गुरफटून गेले.


स्वतः वर कायम "अन्याय"करत राहिले.

मुलगी शिकली की सारं घरं शिकलं म्हणतात;


आणि तीच मुलगी घराबाहेर करियर करायला पडली की साऱ्या घरदारावर आभाळ कोसळतं.


काळाच्या ओघात मुलगी शिकली पण तिला सावरून कोणीचं नाही घेतलं......


ती जरा बोलली की,ती मात्र "अघावं" ठरली.

पुरुषप्रधान संस्कृती आपली....... 

खरं सांगू ;ती कधीचं नाही बदलली.


काळाच्या ओघात बाई "चूल आणि मूल" यांच्या सोबत "व्यवहार" ही सांभाळू लागली.

पण हीच गोष्ट अजूनही कित्येकांच्या मनी नाही रुचली.


काळाच्या ओघात म्हणे सारी दुनिया बदलली......;

पण.....


एक "स्त्री"अजूनही प्रत्येक नातं टिकवण्यासाठी-जपण्यासाठी "तारेवरची कसरत" करत राहिली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy