STORYMIRROR

Savita Jadhav

Tragedy

4  

Savita Jadhav

Tragedy

आसवांचा भवसागर

आसवांचा भवसागर

1 min
242

आज चिंब चिंब झाले,

भवसागरात आसवांच्या,

उलगडल्या साऱ्या गोष्टी,

जपलेल्या कप्प्यात मनाच्या.


अचानक झुळुक आली,

झुलला आठवणींचा हिंदोळा,

स्वप्नातून झाली जागी,

पण उघडू वाटेना डोळा.


रात्रीच्या त्या नीरव शांततेत,

चाहूल लागली सख्या तुझी,

क्षणभर वाटे भास हा नसावा,

खरच व्हावी भेट तुझी माझी.


भावना कितीतरी हळव्या मनाच्या,

बंद होत्या ह्रदयाच्या गाभाऱ्यात,

आठवणी साऱ्या ताज्या झाल्या,

वाहू लागल्या आसवांच्या भवसागरात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy