ह्रदयीचा तडा
ह्रदयीचा तडा
ढळू लागता दिवस
व्याकुळता मनी दाटे
चुक हातून न झाली
तरी गुन्हा माझा वाटे
चढू लागे रात्र जशी
मन थाऱ्यावर नाही
अंतरीच्या जखमांनी
फाटे कोवळेसे काही
निशिगंध आसवांचा
गालावर ओघळतो
प्रेम सडा प्राजक्ताचा
सखा पायी तुडवतो
प्रकाशात चांदण्याच्या
ओलावती नेत्र कडा
कसा भरून निघावा
सांग ह्रदयीचा तडा
