राहिले ते स्वप्न अधुरे
राहिले ते स्वप्न अधुरे
राहिले ते स्वप्न अधुरे
तू अन् मी जे पाहिले
स्पंदन प्रेम बंधनात
आज का नाही राहिले?
स्वप्न उराशी प्रितीचे हे
अबोल हृदयात जाहले
दुःख वेड्या या जीवाने
का एकटेच साहले?
हास्य ओठातून येई
अश्रू उरातच कोंडले
रेशीम बंध गुंफले जे
नियतीने ते सोडले
सोनेरी ती सुख संध्या
तिमिराने तिज बांधले
तोडीले हृदय सख्या रे
तुकडे वेदनेने सांधले
कोमेजल्या भावनांना
विरह गंधाने चुरगाळले
प्रतिबिंब माझ्या प्रेमाचे
भास समजुनीच गोंजारले
