STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

माझा जीवन आधार

माझा जीवन आधार

1 min
185

मम माता पिता हेच

बालपणी शिल्पकार

घडविले जडविले

जीव लावूनी साकार


नुसतेच ना शिक्षण 

सुसंस्कृत मज केले

नीतीमूल्ये बिंबवुनी

व्यक्तिमत्व घडविले


पायावरी उभे केले

कन्यादान हौसेमौजे

साथीदार चिंतामणी

कर्तव्यास श्रेष्ठ माने


पार पाडली कर्तव्ये

झाली गोड दोन मुले

सहवास हा सुखाचा

मनी आनंद उमले


लेक माझे फार गुणी

खूप यश संपादले

पाय परि भूमीवरी

विनयेनच वागले


माझा जीवन आधार

आता पती अन् मुले

काव्य क्रीडा संगीतात

सुखेनैव मी नाहले


पूर्वसंचिताने लाभे

हा आधार परिवार

देवा वंदन तुजला

तव आशिष आधार



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract