जय भिम नसे कुण्या एका जातीचा
जय भिम नसे कुण्या एका जातीचा
राखेतून जन्मला पेटता निखारा
विषमतेला जाळून नष्ट करणारा
स्वयंतेजाने स्वयंप्रकाशित होऊन
अंधकार पिढ्यांचा दूर करणारा
पशुपरी जाचक चतृवर्णव्यवस्थेला
आव्हान देऊन रणशिंग फुंकणारा
मनूवाद्यांचे धाबे दणाणून सोडून
शोषकांचे अभेद्य भींग फोडणारा
अपमान घोर निराशेने होणारे
दुबळ्यांचे हनन थांबवणारा
खाणेपिणे नसे जगणे पटवून
मुडद्यात स्वाभिमान जागवणारा
बुद्ध-शिव-फुले-शाहू आदर्शातून
ज्ञानदीपाची मशाल जगी पेटवणारा
बुरसटलेल्या रुढींना मातीत गाढून
चिखलातून कमळागत उगवणारा
खडकाला भेदून दूर विस्तारणारा
बिजांकूर होता भारताच्या मातीचा
समता बंधुता स्वातंत्र्य स्थापणारा
जय भिम नसे कुण्या एका जातीचा....
