ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा
1 min
134
ज्ञानियांचा राजा
एकनाथ म्हणे।
जन्म आपेगावी ।।
सार्थकी ते लावी ।
ज्ञानदेव ।।१।।
भावार्थ दिपिका ।
अमृतानुभव ।।
दिले भक्तिस्तव ।
हरिपाठ ।।२।।
जणांच्या उद्धारा ।
आज दावी आशा ।।
प्राकृतशी भाषा ।
ज्ञानेश्वरी ।।३।।
रेड्याच्या तोंडून ।
वदवले वेद ।।
नाकारिले भेद ।
प्राणीमात्रा ।।४।।
सांगे संप्रदाय ।
हरीभक्ती मार्ग ।।
वर्तमानी स्वर्ग ।
जगण्यास ।।५।।
धन्यली आळंदी ।
करता स्मरण ।।
होतसे दर्शन ।
माऊलीचे ।।६।।
सांगतो राजन ।
राजा ज्ञानियांचा ।।
वैष्णव भक्तांचा ।
मार्गदाता ।।७।।
