भिम आहे खास....!
भिम आहे खास....!
कोंडलेल्याचा श्वास
भूकेलेल्याचा घास
कर्तव्याचा न्यास
भिम आहे खास...!
हरलेल्याची आस
निर्भयाचा आभास
जिंकण्याचा ध्यास
भिम आहे खास...!
विषमतेचा फास
समतेचा वास
मानवतेचा सुहास
भिम आहे खास...!
शिक्षणाचा दास
अंधाराचा पाश
अपयशाचा नाश
भिम आहे खास...!
बेघराचा निवास
दुर्बलतेचा संन्यास
चैतन्य देई हमखास
भिम आहे खास...!
जिद्दीचा हव्यास
चिकित्सेचा व्यास
ज्ञानियांचा अभ्यास
भिम आहे खास...!
