चौदा एप्रिल....!!!!
चौदा एप्रिल....!!!!
आता,... ऐकू
येतील हाका
मळक्यातला
दिसेल काका
सीझन संपला
चौदा एप्रिलचा
मतलबींच्या
आशिष्ट थ्रीलचा!
नव्या पिढीचे
आम्ही युवा
भीम क्रांतीचे
आम्हीच दुवा..
शिक्षित आम्ही
एकत्रित आलो
निर्बुद्धीजीविंचे
लीडर झालो!
नृत्य गायनाने
केले प्रबोधन
भीम विचारांना
दुरूनच वंदन....
वैचारिकवादाला
ट्रोलाने ठेचले
समवयीनाही
स्टेजबाहेर फेकले
अपुल्या वर्चस्वाचा
टिकविण्या भार
विचारवंतानाही
केले हद्दपार..
ह्या मनोरंजनाचे
आम्ही उपभोक्ता
अमुच्या टॅलेंटचा
दाखविला तक्ता!
गावकुसात आता
मस्त जगायचं
एप्रिलफूल पर्यंत
सर्वांशी बोलायचं!!!
-------------------------------------
✍️ राजन जाधव
मठ- वेंगुर्ला
सिंधुदुर्ग
9763206782
