आरक्षण
आरक्षण
किती होतील हल्ले अन
किती टिका संविधानावर
प्रतिक्रांतीच्या डोळ्यात
खुपतेय आजही आरक्षण!
आरक्षणाने गुणवंतांचे
म्हणे केले उच्चाटन
सवर्णातं जन्मा येण्यास
गुन्हा मानतात कैकजण
जातंउतरंडीने वंचितांचें
केलेले विसरला भक्षण?
समाज प्रवाही आणण्यास
केले राजर्षीनी औक्षण!
माणूस बनून जगण्यास
सक्तीचे झाले हो शिक्षण
कायद्याने मूलभूत केले
माणुसकीचे संगोपन
शासकीय नोकरीपुरते
नको...आता ज्ञानार्जन
विवेकसंपन्न समाजनिर्मिती
असावे ध्येय धोरण
जातीमुळे नाकारलेल्या
गुणवत्तेचे थांबवण्या शोषण
संधीस प्रतिनिधित्वाच्या
उपलब्धतेचे पोषण....!
शोषितांच्या बंडखोरीने
उध्वस्त होईल जनजीवन
एकसंघ राष्ट्राच्या उभारणीस
ध्यानात घ्यावे संजीवन
आरक्षण नसे जाती-जातीत
असंतोष कलहाचे कारण
जाती व्यवस्था नष्ट होताच
नष्ट होईल आरक्षण!!
-------------------------------------------
✍️ राजन जाधव
मठ- वेंगुर्ला
सिंधुदुर्ग
9763206782
