आठवांचा साठा
आठवांचा साठा
**आठवांचा साठा*
दैदीप्यमान कर्तृत्व तुझे
आठवून थकले डोळे
मार्ग शोधताना परतीचा
पोटी जमू लागले गोळे
आप्तजणांचा भार...तु
एकट्याने वाहीला कसा
सर्व मिळून आम्ही आज
झटतो उमटविण्या ठसा
वरकणी जरी कठोर
देहबोली वाटे अवजड
अमृतापरी मन स्वभाव
मृदुलवाणी आठवे गोड
मूर्त अमूर्त स्वप्न तुझी
पूर्ण करण्या कष्ट फार
आशिष मस्तकी तुझा
कर्तव्यास देई आकार
तुझ्या आठवांचा आहे
शिदोरीत भरगच्च साठा
दुःख,अपयश,नैराश्याच्या
उसळू दे कितीही लाटा
वचनबद्ध होतो मामा_
तुझ्या चतुर्थ स्मृतिदिनी
यश आमचे झळकवेल
नाव तुझेच क्षणोक्षणी
----------------------------------------
✍️ _राजन जाधव_
_मठ -वेंगुर्ला_
_सिंधुदुर्ग_
_9763206782_
