दुनियादारी
दुनियादारी
सोडून द्यावी दुनियादारी
द्यावे सोडून मानपान
मतलबी दुनियेत साऱ्या
भावनांना नाही स्थान
शोधत राहीलास नेहमी
बंधुत्त्वामध्ये घोर समाधान
तुझ्यातले चांगले वेचण्या
समोरुन झाले किती गुणगान
कधी माणुसकीतून कधी
आपुलकीतून दिले सर्वा ज्ञान
तात्विक सात्विक बोल तुझे
मात्र , टोचले होऊन बेभान
रक्ताच्या नात्यांसोबतच, त्या
पलिकडची नाती जपली
सत्यअसत्याची समीक्षा
निःपक्षतेने कुणा ना रुचली
तुझ्यासारखेच दुसऱ्यांना
तू समजून घेत गेलास
भाऊबंधू आपुलेच सारे
स्वतःहून गैरसमज केलास
