जगून पहावे
जगून पहावे
का खचावें जगताना
अपयशाच्या भीतीने
शस्त्र बनवून त्यासी
खूप लढावे स्फूर्तीने
हवंय मिळेल निश्चित
नको किंचित कुशंका
कठोर परिश्रमाने
वाजू दे यशाचा डंका
अतिघाई संकटाची
पाठीराखी दिशा दाही
त्रागा करून स्वतः चा
नीती साथ देत नाही
मनातील विचारांची
चेतना जागवताना
ध्येय पूर्तीच्या श्वासांना
पाहिलंय कोंडताना
धीर गंभीर जगणे
मृत्यू सम वाटे खरे
सांग भ्रमिष्ट मस्तिष्क
कसे मनास सावरे
जीवनाचे सप्तसूर
हुडकून गीत व्हावे
नको कुणा, स्वतः साठी
पुन्हा जगून पहावें
--------------------------------------
✍️ राजन जाधव
मठ-वेंगुर्ला
सिंधुदुर्ग
9763206782
