नाम शिवबा तयाचे
नाम शिवबा तयाचे
भेदाभेद अमंगळ
खडे तुकोबाचे बोल
बालवयी हृदयात
रुजे दूरवर खोल
स्वराज्यास जोडीयेल्या
अठरा पगड जाती
प्रत्येकाच्या कौशल्याने
दिला पदभार हाती
पर स्त्री माते समान
थोर तत्व स्विकारीले
उपभोगी प्रवृत्तीना
कटू दंडाने तारिले
अल्प अशी जहागिरी
गड किल्ल्यानी मढली
खऱ्या हर्षाने रयत
हिरे मोत्यांनी सजली
मरणान्ति मारण्यास
सदा मावळा तत्पर
लढे शत्रुसी तुटून
त्याची तोडून लक्तर
सह्याद्रीच्या उदरात
जन्मतसे धुरंदर..!
नाम शिवबा तयाचे
घेता दाटे आज ऊर
जन्मदिनी नुसताच
नको जय जयकार
नितिमूल्ये श्रीरायाची
करू सारे अंगीकार
----------------------------------------------
✍️ राजन जाधव
मठ-वेंगुर्ला
सिंधुदुर्ग
9763206782
