मी पाहिला ईश्वर ......
मी पाहिला ईश्वर ......
मी पाहिला ईश्वर ......
माणसातला माणूस बनून
माणूसपण शिकवणारा
मी पाहिला ईश्वर......
मनगटांच्या जोरावर
दैव बलवत्तर बनवणारा ।। धृ।।
पाण्याचा वाद मिटवण्या
राजविलास त्यागणारा
मानवी दुःख निरोधाचे
सम्यक मार्ग निर्मिणारा
मी पाहिला ईश्वर ...... ।।१।।
शूद्रातिशूद्र भेद नाकारुन
समतेचे दर्शन घडवणारा
स्वराज्य उभारुन मानवतेचे
रयेतेचा वाली बनणारा
मी पाहिला ईश्वर ...... ।।२।।
प्रजाहित दक्षता हाच धर्म
धर्माभिमानाने पाळणारा
मृत्यूच्या डोळ्यात डोळे
घालून त्यास कवटाळणारा
मी पाहिला ईश्वर ...... ।।३।।
शिक्षणावाचून गती नाही
अविद्येचे अनर्थ जाणणारा
विद्येची क्रांतीज्योत सर्व
जनमाणसात पेटवणारा
मी पाहिला ईश्वर ...... ।।४।।
अशक्ताला सशक्त बनविणे
कर्तव्य अपुले मानणारा
दीन-दुबळ्यांच्या पुनर्वसनास
हक्काचे आरक्षण मांडणारा
मी पाहिला ईश्वर ...... ।।५।।
सर्व जाती धर्मांना एकाच
छताखाली एकत्र नांदवणारा
लेखणीच्या ताकदीने लोकशाही
राष्ट्र प्रस्थापित करणारा
मी पाहिला ईश्वर ...... ।।६।।
मी पाहिला ईश्वर ......
माणसातला माणूस बनून
माणूसपण शिकवणारा
मी पाहिला ईश्वर......
मनगटांच्या जोरावर
दैव बलवत्तर बनवणारा ।। धृ।।
