साश्रूंनी नमन
साश्रूंनी नमन
कधी आप्तेष्टांमध्येही
अश्रूहीन रडवणाऱ्या
कधी एकटेपणात
मनोबल वाढवणाऱ्या
गतकाळाच्या त्या
आठवणी साऱ्या
खचलेलो असताना
प्रेरेणेला सुखावणाऱ्या
उत्तुंग कर्तृत्वाचे
क्षितिज गवसताना
होरपळून निघाल्या
भीषण यातना
माणुसकीचा साठा
अंतरात दडलेला
दारी आलेला रिता
भरुन परतलेला
ख्यातीने वसुंधरा
रवी शशि नभांगण
उल्हासित व्हायचे
घरदार अंगण
शोकाकूल होतात
आठवून आप्तजन
तुझ्या तृतीय स्मृतीस
मामा साश्रूंनी नमन
