रंगपंचमी
रंगपंचमी
रंगाची दुनिया
अलबेल आहे
रंगातून पहा
सारे भाव वाहे||१||
रंगातूनी दिसे
विश्व हे सुंदर
वाटते पहावे
सदा निरंतर||२||
नानाविध रंग
जाणतसे भाव
शब्दातून घेती
अलगद ठाव||३||
रंगांच्या जगात
भेदभाव नसे
एकोप्याचे भाव
सदोदित वसे||४||
असे विश्वामध्ये
अद्भुत नजारा
रंगाचा जीवनी
असतो सहारा||५||
रंगाची किमया
असे अनमोल
दाखविती पहा
जग बहुमोल||६||
