ती व्यक्ती
ती व्यक्ती
मनात नव्हते कधीच काही, खरे तेच बोलून गेली
नक्की असे काही झाले, म्हणून "ती व्यक्ती" हरवून गेली
खूप दुःखानंतर मिळाली होती, माझे मन ती समजून गेली
तीची जागा नाही कुणाचीच, पण "ती व्यक्ती" च हरवून गेली
जगातील माझी आवडती व्यक्ती, जिच्याजवळ मन मोकळे करून गेली
माझ्या जीवनात होती ती एकच, पण तिलाच मी गमावून गेली
तिच्यासारखी तीच फक्त, मनात स्थान मिळवून गेली
मनाला तिचीच सवय झाली, पण तिच्या मनातून मी निघून गेली
तिचाच चेहरा डोळ्यासमोर, फोटोशी तिच्या मैत्री झाली
मीच एकटी बोलत बसते, पण "ती व्यक्ती" अबोल झाली
जगातील ती एकच अशी, जिची सवय मनाला झाली
तिचे मन दुखावले गेले, म्हणून मी मागे वळून गेली
मनात राहिल्या तिच्या आठवणी, वाट पाहता थकून गेली
जीवनातील सर्वात प्रिय व्यक्ती, जीवनातूनच निघून गेली
जिला गमावण्याची होती भीती, माहिती नाही कधी सत्यात आली
जगात माझे मन समजून घेणारी, "ती व्यक्ती" हरवून गेली
कोणीच नव्हती ती माझी, पण कोणीतरी होऊन गेली
मन शांत झाले जिच्याजवळ, आज तीच तिरस्कार करून गेली
कधी मिळेल का ती पुन्हा?, जी दुःखात आधार होऊन गेली
प्रतिमेशी जिच्या बोलत राहते, "ती व्यक्ती" च मी हरवून गेली
भीती होती जिला गमावण्याची, तिलाच जीवनात गमावून गेली
काहीही न विचारताच, तिला गमावण्याच्या वेदना ती देऊन गेली
